कोल्हापूर परिसरात भूकंपाचे धक्के; नागरिक भयग्रस्तकोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.
कोल्हापूर परिसरात काल म्हणजे शनिवारी रात्री ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र विभागाने दिली आहे. ह्या भूकंपाचा केंद्रबिंदू कोल्हापूरच्या पश्चिमेला १९ किलोमीटर अंतरावर होता.कोल्हापूरपासून १९ किलोमीटर कळे गावाजवळ केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे.सौम्य भूकंपाचे धक्के असले तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. काही भागांत भूकंपाचे धक्के सर्वसामान्यांना जाणवले नसल्याचीही माहिती समोर येत आहे. वारणा खोरे व कळे हे भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. भूकंपाची खोली जमिनीच्या आत ३८ किलो मीटर असल्याने भूकंपाचा धक्का जाणवला नाही.
Seismo.gov.in च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथे रात्री 11 वाजून 49 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे.