कोतवाली पोलीस ठाणे परिसरातील बाथरूममध्ये एका व्यक्तीची आत्महत्या : संबधीत व्यक्ती एस टी महामंडळातील निवृत्त कर्मचारी :

अहमदनगर :कोतवाली पोलीस ठाणे परिसरातील बाथरूममध्ये एका व्यक्तीची आत्महत्या

अहमदनगर :शहरातील कोतवाली पोलीस ठाणे (Kotwali police station)परिसरातील बाथरूममध्ये एका व्यक्तीचा मृतदेह(Corpses)गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीजवळ मिळाल्या वाहन परवान्यावर ज्ञानेश्वर मराठे असे नाव, संबंधित व्यक्तीने 2 दिवसांपूर्वी आत्महत्या (committed suicide) केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या बाथरूमचा वापर तुरळक होत असल्याने घटनेची माहिती उशिराने समजल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान आज परिसरात दुर्गंधी पसरल्याने हा प्रकार समोर आला. गळफास घेतलेला इसम साधारण 60 ते 62 वर्षाचा असावा असे समजते.सोबतच कागदपत्रांवरून संबधीत व्यक्ती एस टी महामंडळातील निवृत्त कर्मचारी असल्याचं समजत आहे. लुंगीच्या साहाय्याने या व्यक्तीने गळफास घेतला,दरम्यान पोलिसांनी मृतदेह(Death body)शवविच्छेदनासाठी पाठवला असून,या व्यक्तीने पोलीस ठाणे परिसरातच आत्महत्या केल्याने चर्चांना उधान आले आहे. संबंधित आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यासाठी या व्यक्तीने कोतवाली पोलीस ठाण्याचीच निवड का केली? एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडत असताना कुणीच कसं बघितले नाही? अशा एक अनेक प्रश्नांचा उलगडा पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे.दरम्यान यावेळी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सौरभ अगरवाल, पोलीस निरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here