कांद्याची निर्यातबंदी उठवण्याची मागणी / तहसिलदारांना निवेदन सादर
राहूरी :
केंद्र सरकारने तातडीने कांदा पिकावरील निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी राहुरी तालुका युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना निवेदन देऊन करण्यात आली.
या निवेदनात युवक काँग्रेसचे समनव्यक राजेंद्र बोरुडे आणि संदीप पुंड यांनी म्हटले आहे, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाबाबत जी अन्यायकारक निर्यात बंदी घातलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
केंद्र करकारने घेतलेला हा निर्णय शेतकरीविरोधी असून या निर्णयाचा फटका सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. कोरोनाच्या संकट काळात शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा देण्याऐवजी अधिक अडचणीत अन्यायाचे महापाप केले आहे.
कांदा निर्यांतबंदीच्या निर्णयाची बातमी येताच कांद्याचे दर प्रचंड कोसळले आहेत. केंद्र सरकार शेतकरीविरोधी असल्याचे या निर्णयावरून स्पष्ट होते आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय तातडीने मागे घेऊन कांदा निर्यात सुरु करावी.
अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमवेत राहुरी तालुका युवक काँग्रेस कमिटीच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी राजेंद्र बोरुडे, संदीप पुंड, शुभम पाटील, मयूर अडागळे, कुणाल पाटील, शरद पवार, सुनील भालके, वैभव शेटे, शिवराज पवार, सचिन नालकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.