कला पथकाच्या माध्यमातून शासन जनतेच्या दारी-प्रांताधिकारी गोविंद शिंदे

337

शिर्डी – शासनाने गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत विविध विभागामार्फत अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या आहेत. या योजना वेगवेगळ्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविल्या असून कलापथकाच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेच्या दारी पोहोचविण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी केले.

लोककला पथकांच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रचार-प्रसार कार्यक्रमांची सुरूवात अहमदनगर जिल्ह्यात आजपासून झाली. शिर्डी येथे छत्रपती शिवाजी महाराज संकुल परिसरात आज कला साध्य कला पथकाचे शाहीर संदीप जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारूडे, पोवाडा, शाहीरी या पारंपरिक माध्यमांतून कार्यक्‌रम सादर केला आणि शासकीय योजनांची माहिती नागरिकांना दिली. कार्यक्‌रमाचे उद्घाटन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्याहस्ते, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे आणि नगर सेवक सचिन चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीतीत झाले.

कलापथकाच्या माध्यमातून शासन जनतेच्या दारी आले असून, प्रबोधनातून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना केले. नगर सेवक सचिन चौगुले आणि मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांना मिळणार असल्याचे सांगितले.

कला पथकाचे शाहीर संदीप जाधव यांच्या पथकाने सादर केलेल्या लोकनाट्याला जमलेल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कलापथकाने शासनाच्या योजनांची माहिती सहज आणि सोप्या शब्दात दिल्यामुळे योजनांची माहिती मिळाली अशी भावना जमलेल्या नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे लोककलेच्या माध्यमातून जिल्हायातील 14 तालुक्यांत 17 मार्चपर्यत हा जागर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here