कर्जत पोलिसांची कारवाई :घरफोडी गुन्ह्यातील फरार आरोपी अटक ;
अहमदनगर- घरफोडी गुन्ह्यामध्ये ९ महिन्यांपासून फरार असणा-या आरोपीस पकडण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. प्रदिप ज्ञानदेव भोसले (वय २० वर्ष रा.साळंदी रोड, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पो. नि. चंद्रशेखर यादव , सपोनि सतीश गावित,पोकाॅ अंकुश ढवळे, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनिल खैरे, सलीम शेख, गोवर्धन कदम आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत समजलेले माहिती अशी की, विशाल नारायण दळवी ( रा.शहाजी नगर, कर्जत ता. कर्जत जि.अ.नगर) यांच्या व आणखी एका ठिकाणी घरी अज्ञात आरोपींनी दि.११ मार्च २०२१ या दिवशी रात्रीच्या वेळी घरफोडी केली होती. याबाबत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. कर्जत पोलिसांनी कसोशीने तपास करून आरोपी निष्पन्न केले. यात विकी विश्वास काळे ( वय २३ वर्ष रा. सांगळे वस्ती, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर), नंदया पायथ्या पवार (वय २० वर्ष रा.साळंदी रोड, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) यांना दि.20 एप्रिल 2021 रोजी अटक केले होते व आरोपी प्रदिप ज्ञानदेव भोसले (वय २० वर्ष रा.साळंदी रोड, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) हा फरार होता.या आरोपीस गोपनीय माहिती वरून श्रीगोंदा येथून अटक करण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालया समक्ष हजर केले असता न्यायालयाने अटक आरोपीस 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.