मुंबई – अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा आडवाणीने ‘कबीर सिंह’ या चित्रपटात एकत्र काम केले होते या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहे तसेच कियारा आणि शाहिदच्या जोडीला प्रेक्षकांनी भरपूर पसंती दिली होती.
आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसण्याचे संकेत आता कियाराने दिले आहे. शाहिद कपूरच्या ४१व्या वाढदिवसाला
शुभेच्छा देताना कियाराने एक पोस्ट शेअर केली. त्यात हैप्पी बर्थडे एसके. चल लवकरच आपल्यासाठी एक उत्तम स्क्रिप्ट शोधूया.’ असे तिने लिहिले आहे.
यावर उत्तर देताना शाहिदने ‘प्रीती, तुझ्या डेट्स उपलब्ध आहेत का!’ असे कमेंट केले आहे. दोघांच्याही या संवादावरून ही जोडी ‘कबीर सिंह’नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चेला बॉलिवूडमध्ये उधाण आले आहे. हे दोघे कोणत्या चित्रपटात एकत्र येणार आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शक कोण असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.










