कत्तलीसाठी आणलेल्या १८ जनावरांची सुटका, दोन जनांवर गुन्हा दाखल

831

अहमदनगर – कत्तलीसाठी आणलेल्या १८ गोवंशीय जनावरांची सुटका नगर तालुका पोलिसांनी केली. ट्रकसह १३ लाख ३४ हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरूख सादीक सय्यद (रा. माळीचिंचोरा ता. नेवासा), रिजवान नियाज पठाण (रा. चांदा, घोडेगाव रोड ता. नेवासा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

भातोडी पारगाव (ता. नगर) शिवारात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे आणली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने या माहितीनुसार छापा टाकून ट्रक व १८ जनावरे ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. सुटका केलेल्या गोवंशीय जनावरे गोशाळेत देण्यात आले असून, ट्रक जप्त करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सानप, उपनिरीक्षक बोराडे, पोलीस अंमलदार घोरपडे, खेडकर, घोडके, बांगर, वणवे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here