कडबोळी:

कडबोळी

साहित्य:
• २ भांडी कडबोळ्याची भाजणी
• दीड चमचा मीठ
• अर्धा चमचा हळद
• अर्धा चमचा हिंग
• २ चमचे लाल तिखट
• २ चमचे धने पूड
• १ चमचा जिरे पूड
• १ चमचा ओव्याची पूड
• पाव वाटी तीळ
• ४०० ग्रॅम तेल

कृती:
• भाजाणीत अर्धी वाटी गरम तेल व वरील सर्व साहित्य घालून पीठ चकलीच्या भाजणीप्रमाणे भिजवावे.
• हाताने चकलीप्रमाणे छोटी छोटी भुईचक्राएवढी कडबोळी करून मंद आचेवर तळावीत.
• कडबोळी १०-१५ दिवस छान टिकतात.

कडबोळी ची भाजणी
१ वाटी ज्वारी ,१ वाटी बाजरी,१ वाटी छान डाळ १ वाटी मुग डाळ १ वाटी उडीद डाळ,१ वाटी जाड तांदूळ , पाव वाटी धणे आणि पाव वाटी जिरे
कृती
सर्व प्रथम जाड बुडाच्या कढई तापवा
व त्यात ज्वारी भाजून घ्या
अगदी २ ते ३ मिनिट ज्वारी भाजावी
ह्या होण्याआधी ज्वारी परातीत काढून घ्या
आता अशाच प्रकारे बाजरी हि भाजून घ्या
२ ते ३ मिनिटांनी परातीत काढून घ्या
आता एक एक करून सर्व डाळी वेगवेगळ्या भाजा व परंतु काढून घ्या
यानंतर तांदूळ फक्त गरम करून घ्या म्हणजे हाताला चटकालागेल इतकेच भाजा
सर्वात शेवटी धने व जिरे भाजून घ्या
तयार भाजणी गिरीणीतूनच दळून आणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here