कंगनाच्या ‘तिखट’ प्रत्युत्तराने फिल्म इंडस्ट्री हादरली!
मुंबई / वृत्तसंस्था
खा. जया बच्चन यांच्यानंतर आता अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यात सध्या शीतयुद्ध रंगलंय. उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाविरोधात काही गोष्टी बोलून दाखवल्या आणि त्यावर कंगनाने ‘तिखट’ प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे फिल्म इंडस्ट्री हादरली आहे.
कंगनाने उर्मिला यांचा उल्लेख ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ असा केला होता. मात्र त्यानंतर छत्रपती शिवरायांचा फोटो ट्विट करुन उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाला प्रत्युत्तर दिलंय.
‘प्रतिशोध मनुष्य को जलाता रहता है, संयमही प्रतिशोध को काबू पाने का उपाय होता होता है, शिवाजी महाराज अमर रहें’ असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
यापूर्वी कंगना म्हणाली होती, ‘उर्मिला मातोंडकर यांची एक आक्षेपार्ह मुलाखत पाहिली. ज्याप्रकारे त्या माझ्याबद्दल बोलत आहेत, ते पूर्ण डिवचण्यासारखं आहे.
उर्मिला यांनी माझ्या संघर्षाची खिल्ली उडवली. मला भाजपाकडून तिकिट हवं आहे, असं त्यांना वाटतं आहे. त्यामुळे त्या माझ्यावर शाब्दिक हल्ला करत आहेत.
मात्र उर्मिला मातोंडकर या सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. हे जरा उर्मटपणाचं वाटेल पण त्या नक्कीच त्यांच्या अभिनयासाठी ओळखल्या जात नव्हत्या. ‘सॉफ्ट पॉर्न’साठीच ओळखल्या जात होत्या.