एस श्रीशांत पुन्हा दिसणार आयपीएलमध्ये..,इतका ठेवला आपला BASE PRICE

431

मुंबई- 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे चर्चेत आलेला भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांत (S. Sreesanth) पुन्हा एकदा आयपीएलमध्ये (IPL) खेळताना दिसण्याची शक्यता आहे. त्याने नुकताच आयपीएल 2022 साठी होणाऱ्या मेगा लिलावामध्ये आपला नाव नोंदविला आहे.

आयपीएल 2022 साठी पुढच्या महिन्यात 12 आणि 13 फरवरी रोजी मेगा लिलाव होणार आहे. या लिलावासाठी एकूण 1 हजार 214 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार श्रीशांतने आपला बेस प्राईस 50 लाख रुपये ठेवला आहे.

श्रीशांत शेवटचा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता आणि या संघासोबत खेळताना तो 2013 मध्ये फिक्सिंग प्रकरणात अडकला होता. त्याच्यासह त्याच संघाचे आणखी दोन खेळाडू फिक्सिंग प्रकरणात अडकले आहेत.

फिक्सिंगच्या आरोपांमुळे श्रीशांतने अनेक वर्षे लढा दिला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले होते. अखेर, बीसीसीआयने श्रीशांतला क्लीन चिट दिली आणि आता कोणत्याही संघाने त्याला निवडले तर तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. गतवर्षीही त्याने लिलावासाठी आपले नाव दिले होते मात्र त्याला कोणत्याही संघाने खरेदी केला नव्हता. आपल्यावरची बंदी उठल्यानंतर तो देशांतर्गत स्पर्धांमध्ये (सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे) खेळला आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 44 सामन्यांत 40 विकेट घेतल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here