मुंबई – नुकताच बॉलीवूड मधून राजकारणात एन्ट्री करणारी चर्चित अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने नुकताच एका मुलाखतीमध्ये आपल्या आयुष्याबद्दल भाष्य केले आहे.
या मुलाखतीमध्ये तिला विचारण्यात आले की तू आई कधी होणार? किंवा एखाद्या बाळाला दत्तक घेणार आहेस का? या प्रश्नावर तिने जे उत्तर दिला आहे. त्यावरून ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.
या प्रश्नाचा उत्तर देत ती म्हणाली की या गोष्टींचा फार कधी विचार केला नाही. हो आणि नाही पण. जेव्हा या गोष्टी व्हायच्या असतील तेव्हा त्या होतातच असे उर्मिला म्हणाली. पुढे ती म्हणाली, प्रत्येक स्त्रीने आई व्हावे असे काही नसते. ते योग्यवेळी आयुष्यात येतच. मला लहान मुले प्रचंड आवडतात. जगात अशी अनेक मुलं आहेत ज्यांना मायेची, प्रेमाची गरज आहे. मी बाळाला जन्म देतेय की नाही हे महत्त्वाचे नाहीये असे उर्मिला म्हणाली.
उर्मिला मातोंडकर २०१६ मध्ये मॉडेल मोहसिन अख्तरशी लग्न केला होता. आणि नुकताच ती शिवसेना पक्षात सामील झाली आहे.उर्मिला मातोंडकर सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. तिने बॉलिवूडकडे पाठ फिरवत राजकारणात प्रवेश घेतला असला तरी अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे. त्यासोबत तिने अनेक मोठ्या कलाकारांसोबतही स्क्रीनही शेअर केली आहे.