उदयनराजे भोसले देणार भाजपाला धक्का, जाणार पुन्हा राष्ट्रवादीत?

856

पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) भेट झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. पुन्हा एकदा उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे.

उदयनराजे भोसले यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होते. मात्र त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी साताऱ्यातील विकास कामांविषयी आपली अजित पवारांशी चर्चा झाल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं. अजित पवारांसोबत विकास कामांबाबत चर्चा झाली. विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात अजित पवारांना विनंती केली असं ते म्हणाले.

दरम्यान यावेळी उदयनराजे भोसले यांना पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील घरवापसीविषयी देखील विचारणा केली. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का? अशी विचारणा केली असता उदयनराजे भोसलेंनी दिलेलं उत्तर अनेक तर्क-वितर्कांना उधाण देणारं ठरलं आहे. या प्रश्नानंतर काही सेकंदांचं मौन धरल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं. शिवाजी महाराजांचं जसं सर्वधर्म समभाव हे धोरण होतं, तसंच माझंही धोरण सर्व पक्षीय समभाव असं आहे, असं उदयनराजे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here