उच्च शिक्षण विभागाच्या शिष्यवृत्तीसाठी आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार

330

अहमदनगर – उच्च शिक्षण विभागाच्या विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची 31 मार्चपर्यंत 2022 अंतिम मुदत असून पात्र विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन पुण्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी केले आहे.

उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य आर्थिक सहाय्य, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना (कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तर), राज्य शासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती, शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ शिष्यवृत्ती, राज्यशासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, राज्यशासनाची अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (भाग -2), माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य अशा राज्य शासन पुरस्कृत 14 शिष्यवृत्ती योजनांची राज्यात अंमलबजावणी करण्यात येते.

प्रत्येक पात्र विद्यार्थीनींनी शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी मुदतीत ऑनलाईन अर्ज करावेत. असे आवाहन ही श्री.बोंदर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here