इस्लाम धर्म हाच भारताचा खरा शत्रू – संभाजी भिडे

481

पुणे – नेहमीच काहींना काही कारणाने चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधाना केल्याने ते सध्या चर्चेत आहे.

यावेळी त्यांनी हिंदु मुस्लिम धर्मांत तेड निर्माण करणारे व्यक्तव्य केले आहे. इस्लाम धर्म हाच भारताचा खरा शत्रू असल्याचे वक्तव्य करत हिंदू समाजाने इस्लामला तितक्यात पोटतिडकीने प्रतिउत्तर दिले पाहिजे, असे आवाहनही संभाजी भिडे यांनी केले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी इस्लाम धर्माला लक्ष्य केले. आता हिंदू समाजानेही तितक्याच पोटतिडकीने इस्लामला प्रत्युत्तर दिले पाहिजे. संभाजी महाराजांशी शत्रुत्त्व होतं म्हणून औरंगजेबाने त्यांना तुकडे-तुकडे करून मारले नाही तर यामागे इस्लाम धर्माविषयी औरंगजेबाच्या मनात असलेली पोटतिडीक कारणीभूत होती.

औरंगजेबाच्या मनातील इच्छा वेगळीच होती. औरंगजेबला संपूर्ण भारताचे तुकडे-तुकडे करायचे होते. याच रागातून औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारले. संभाजी महाराज किंवा औरंगजेब नाहीत. पणऔरंगजेब अजूनही बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्या रुपाने अस्तित्त्वात आहे. देशातील गावागावांमध्ये इस्लाम धर्म आहे. हाच आपला खरा शत्रू आहेअसे संभाजी भिडे यावेळी म्हणाले.

संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार किंवा पोलीस संभाजी भिडे यांच्यावर काही कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here