अहमदनगर – इंडियन रेड क्रॉस सोसायटी अहमदनगर जिल्हा शाखेच्या सभासदांची सर्वसाधारण सभा 17 मार्च 2022 रोजी दुपारी 1 वाजता पंडीत जवाहरलाल नेहरु सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय विश्रामगृहामागे, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या सर्वसाधारण सभेत नोंदणीकृत सभासदांची पडताळणी करून पत्ते, मोबाईल क्रमांक फोटो संकलीत करुन यादी अद्ययावत करणे, संस्थेची नियमावली तपासून सदस्य नोंदणीबाबत चर्चा, जिल्हा शाखेचे पदाधिकारी निवडणेबाबत करावयाची कार्यवाही, 12 सभासदांचे प्रस्ताव राज्य शाखेकडेस पाठविणेबाबत व ऐनवेळी उपस्थित होणारे विषय घेण्यात येणार आहेत.
सदर बैठकीस रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखेचे नोंदणी प्रमाणपत्र व ओळखीचा पुरावा असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.असे जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.