आमचा लढा सुरूच राहणार ,किरीट सोमय्यांचा राऊतांवर पलटवार

858

मुंबई – शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आज दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या तसेच त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप केले आहे.

संजय राऊत यांनी लावलेल्या आरोपांवर आता किरीट सोमय्या यांनी पलटवार केला आहे.

२०१७ मध्ये संजय राऊत यांनी सामना वर्तमानपत्राच्या माध्यमातून अशाच प्रकारे माझी पत्नी प्राध्यापिका डॉ. मेधा सोमय्या यांच्यावर इमारत बांधकाम कंपनीच्या संदर्भा आरोप करून मानहानी करण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांनी माझा मुलगा नील सोमय्याचं नाव घेतलं आहे असं सोमय्या म्हणाले.

आत्तापर्यंत ठाकरे सरकारमधील नेत्यांनी माझ्याविरोधात १० गुन्हे दाखल केले आहेत. अजून तीन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मी त्यांची (संजय राऊत) परिस्थिती समजू शकतो. अजून एका चौकशीचं मी स्वागत करतो. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. आम्ही कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुंतलेलो नाही असं सोमय्या म्हणाले.

दरम्यान, आपल्या ट्वीटमधून किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला सवाल केला आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कोविड सेंटर घोटाळ्यावर का प्रतिक्रिया देत नाहीत? प्रविण राऊत आणि सुजीत पाटकर यांच्याशी असलेल्या संबंधांवर का बोलत नाहीत? भ्रष्टाचाराविरोधातील आमचा लढा सुरूच राहणार आहे, असं किरीट सोमय्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here