अहमदनगर शहर व उपनगर भागास पाणी पुरवठा बंद, जाणुन घ्या संपूर्ण माहिती

472

अहमदनगर – विज वितरण कंपनी कडुननगर शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा गुरुवारी (दि.२०) सायंकाळी ५.४५ ते ६.०० या वेळेत खंडीत झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. विजसुरु झाल्या नंतर बंद पडलेला पाणी उपसा सुरु करीत असताना विळद पंपींग स्टेशन येथिल सब-स्टेशन मध्ये तांत्रिक बिघाड झाला. दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर पुर्ण करण्यात येत आहे. यानुसार रात्री १०.०० वाजे पर्यंत विज पुरवठा सुरु होणे व तदनंतर बंद पडलेला पाणी उपसा टप्प्या- टप्प्याने सुरु होणे अपेक्षित असल्याचे महापालिका प्रशासनानं कळविले आहे.गुरुवारी रात्री स्टेशन रोड भागास पाणी पुरवठा होवू शकलेला नाही.

खंडीत विज पुरवठयामुळे शहर पाणी वितरणाच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य होणार नसल्याने शुक्रवारी (दि.२१ ) रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास सिद्धार्थ नगर, लाल टाकी, दिल्लीगेट, नालेगांव, तोफखाना, चितळेरोड, आनंदी बाजार, माणिक चोक, कापडबाजार, नवीपेठ, जुने मनपा कार्यलय परिसर भागास उशीराने व दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
तरी नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर कारकसरिने करावा व महानगर पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

गुरुवारी रत्री वीज पुरवठा सुरु झाल्या नंतर बंद पडलेला पाणी उपसा सुरु करित असतांना विळद पंपींग स्टेशन येथिल सब-स्टेशन मध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झालेला असल्याने युध्द पातळीवर दुरुस्तीचे काम पुर्ण करण्यात येत होते. त्याचवेळी म्हणजेच पहाटेच्या सुमारास तेथील २५०० के.व्ही. ए. चा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याचे निर्दशनास आले. ट्रान्सफॉर्मर दुरुसीचे काम हाती घेण्यात आले असुन आज सायंकाळ पर्यंत दुरुस्तीचे काम पुर्ण होणे अपेक्षित आहे.

२० जानेवारी रोजी सायंकाळी पाणी वाटप सुरु असलेल्या स्टेशन रोड भागास पाणी पुरवठा होवू शकलेला नाही. तसेच आज शुक्रवार दि.२१ जानेवारी रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास सिद्धार्थ नगर, लाल टाकी, दिल्लीगेट, नालेगांव, तोफखाना, चितळेरोड, आनंदी बाजार, माणिक चोक, कापडबाजार, नवीपेठ, जुने मनपा कार्यलय परिसर इ . भागासह सर्व उपनगर भागास पाणी पुरवठा बंद राहाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here