पोदार जम्बो किड्सच्या चिमुकल्यांची ‘व्हर्च्युअली फील्ड ट्रिपची’ सफर.
अहमदनगर येथील पोदार जम्बो किड्स शाळेने पूर्व प्राथमिकच्या चिमुकल्यांसाठी शाळेने ऑनलाईन फिल्ड ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते.
या फिल्ड ट्रिप मध्ये विध्यार्थ्यानी नवीन ठिकाणे, गोष्टी आणि सामान्यत: वर्गात न पाहिलेले लोक शोधण्याची आणि पाहण्याची या उपक्रमाद्वारे संधी मिळाली. या ट्रिपसाठी नर्सरीच्या विद्यार्थ्यांसाठी विषय होता ‘जंगल सफारी अँड टाईम ऑफ फन’, जुनिअर केजीसाठी ‘इट्स फॉरेस्ट फन टाईम’ तर सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी विषय होता ‘एक्सप्लोर ओशन अनिमल्स.
वर्गाच्या व्हर्च्युअल फील्ड ट्रिप दरम्यान, विद्यार्थ्यानी उंच समुद्र सपाटीवरील , आपल्या देशातील राज्ये आणि जवळपासचे किंवा दूरची बरीच ठिकाणे आणि गोष्टी शोधणे तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामध्येसुद्धा घरीच राहून जग पाहण्याची आणि अनुभवण्याची ही संधी मिळाल्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला व पालकांनीही मुलांना दिलेल्या या आगळ्यावेगळ्या अनुभवामुळे समाधान व्यक्त करून शाळेचे आभार मानले.
व्हर्च्युअल फील्ड ट्रिपचे सौंदर्य म्हणजे ते मुलांच्या गरजानुसार शैक्षणिक लक्ष्ये देखील पूर्ण करता येऊन मुलांचे विश्लेषणात्मक आणि गंभीर विचार कौशल्य वाढवण्यासाठी मदत होते . असेही म्हटले आहे की व्हर्च्युअल भेटीमुळे मुले काय वाचत आहेत हे त्यांना स्वतःला समजून घेण्यास मदत होते. सध्याच्या विकसित तंत्रज्ञानामुळे मुलांना अशा दौर्यावर जाण्याची संधी मिळते जे पारंपारिक फील्ड ट्रिपमधून जाणे शक्य नसते.
पोदार जम्बो किड्स शाळा नेहमीच नवनवीन उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकण्यास प्रयत्नशील असते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही शिक्षणामध्ये कोणताही खंड पडू न देता विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शिक्षण कसे देता येईल आणि त्यांच्या सर्जनशीलतेचा कसा विकास साधता येईल या हेतूने शाळा नेहमी पुढाकार घेऊन नवनवीन उपक्रमाचे आयोजन करत असते त्यापैकीच हा एक उपक्रम म्हणजे फिल्ड ट्रिप होय.
सदर ट्रिपचे आयोजन व नियोजन शाळेचे प्राचार्य तुषार कुलकर्णी यांच्या मार्दर्शनाखाली पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका सौ.सरीता परकाळे यांनी केले तसेच ट्रीपच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.












