अहमदनगर ब्रेकिंग : तनपुरे कारखाना आंदोलक कामगारांना अटक

अहमदनगर, 7 सप्टेंबर 2021

:- राहुरी येथील तनपुरे साखर कारखाना कामगार आंदोलकांनी प्रवरा कारखान्याच्या कामगार काळे फासल्याप्रकरणी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मंगळवारी रात्री उशिरा याप्रकरणी ६ कामगारांना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश खर्डे नामक प्रवरा कारखान्याच्या हिशोबनिसास तनपुरे कारखाना कामगारांनी काळे फासले होते.

याप्रकरणी खर्डे यांच्या फिर्यादीवरून इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सीताराम नालकर, बाळासाहेब तारडे, सुरेश तनपुरे, नामदेव शिंदे यांच्यासह इतर कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर आंदोलन सुरूच होते. आंदोलन मिटवण्यासाठी माजीमंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी यशस्वी मध्यस्थी करून आंदोलकांना चेअरमन , व्हाईस चेअरमन यांच्या सह्यानिशी दिलेल्या लेखी पत्रात कामगारांवरील गुन्हा मागे घेण्याचे नमुद करण्यात आले होते.दरम्यान मंगळवारी रात्री उशिरा तनपुरे कारखाना कामगारांना राहुरी पोलिसांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली. सकाळी हा प्रकार कामगार बांधवांना समजताच तनपुरे कारखाना प्रवेशद्वारावर कामगारांनी एकत्रित येऊन संताप व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here