अहमदनगर जिल्ह्यातील ‘ते’ कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश !

783

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ते’ कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश !

अहमदनगर :- शहरात सुरू करण्यात आलेल्या दोन अनधिकृत खासगी कोविड सेंटरला परवानगी देऊ नये, असे आदेश प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी बुधवारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांना दिले.

शहरातील खाडेनगर व बँक ऑफ महाराष्ट्रशेजारी खासगी कोविड सेंटर उभारण्यात येत होते. या संदर्भात स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बोलभट, आम आदमी पक्षाचे बजरंग सरडे,
तसेच रत्नदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे आदींनी लोकवस्तीत कोविड सेंटर उभारण्यात येऊ नये, असे निवेदन तहसीलदार विशाल नाईकवाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाघ यांना दिले होते. तथापि,
या कोविड सेंटरच्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना काम सुरू केले. अधिकारीही टोलवाटोलवी करत होते. त्यामुळे बोलभट, सरडे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे यांनी मंगळवारी परिसरातील रहिवाशांसह प्रांताधिकारी नष्टे यांची भेट घेऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली. नष्टे यांनी पाहणी केली असता खाडेनगरमधील कोविड सेंटरमध्ये रुग्ण आढळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here