अहमदनगर कँन्टोन्मेंट बोर्ड कामगार युनियनच्या स्थापनेच्या हालचालींना वेग!

842

अहमदनगर –
अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्डाच्या असंघटित कर्मचाऱ्यांची युनियन स्थापन करण्यासाठी भिंगारच्या काही प्रमुख कामगारांनी पुढाकार घेतलाय. यासाठी सेवानिवृत्त कामगारांचंही मार्गदर्शन घेण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर अहमदनगर कँन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांची युनियन स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

यासंदर्भात एका कामगाराने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले, की अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे काही अधिकारी कामगारांना काहीशी गुलामासारखी वागणूक देत आहेत. कामगारांकडून बैलांप्रमाणे नुसते काम करुन घेतले जात आहे. मात्र कामगारांच्या अडीअडचणीसंदर्भात कोणताच अधिकारी सहानुभूती दाखवित नाही.

अनेक कामगारांना सुरक्षाविषयक साधने मिळत नाहीत. सध्याच्या कोरोनाच्या महामारीत कामगारांकडून नुसते काम करुन घेतले जाते. मात्र ह्रदयाचे रुग्णआणि दमा, संधीवात, रक्तदाब, मधुमेह असलेल्या कामगारांविषयी देखील कोणीच गांभिर्याने विचार करत नाहीत.

कामगारांनी त्यांच्या मुलभूत हक्कांविषयी संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यास ‘बिनपगारी’ लावण्याची धमकी दिली जाते. हा सारा अन्याय असह्य झाल्याने कामगार युनियन स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे या कर्मचार्‍याने सांगितले.

दरम्यान, अहमदनगर कँन्टोन्मेंट बोर्ड कामगारांची युनियन स्थापन झाल्यास कामगारांना त्यांच्या न्याय्य हक्कांसंदर्भात संघर्ष करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळणार आहे. त्यामुळे अनेक कामगारांनी अहमदनगर कँन्टोन्मेंट बोर्डाच्या संभाव्य कामगार युनियनच्या स्थापनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असल्याचेही या कर्मचार्‍याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here