मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) नेहमीच काही ना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतो. तो कधी त्याच्या खाजगी आयुष्यामुळे तर कधी त्याचे चित्रपटामुळे तो चर्चेत असतो.
माञ आता एक वेगळ्याच कारणाने तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता (lara dutta) याने एका मुलाखतीमध्ये तीच्या आणि सलमानमध्ये असणाऱ्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. सलमान मला दररोज फोन करतो आणि मीही फोन घेते, असं लारा म्हणाली आहे. एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री लारा दत्ता म्हणाली कि सलमान रोज रात्री 12 वाजता मला फोन करतो. इतक्या उशिरा फोन केला, तरी मीही त्याचा फोन घेते असं लारा या मुलाखतीत म्हणाली. यामुळे सलमान पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे.
लारा दत्ता आणि सलमान खानने पार्टनर, नो एन्ट्री या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. पार्टनर या चित्रपटातील सलमान आणि लाराची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.
लारा सोशल मीडियावरही नेहमी अॅक्टिव्ह असते आणि आपल्या फॅन्ससाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.