अन् हिजाब वीवादावरून असदुद्दीन ओवैसींनी सुनावले पाकिस्तानला म्हणाले., तुम्ही

336

मुंबई – कर्नाटक राज्यात सुरू असलेल्या हिजाब वीवादावरून आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकरणावरून सोशल मीडियावर दोन गट निर्माण झाले असून प्रत्येक गटातून आपली प्रतिक्रिया समोर येत आहे. हा प्रकरण वाढल्याने कर्नाटक मध्ये तीन दिवसासाठी शाळा तसेच कॉलेज बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

यातच पाकिस्तानने या मुद्द्यावरून भारतावर टीका केली होती. त्यानंतर आता एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला खड्या शब्दांत सुनावले आहे.

कर्नाटकमध्ये हिजाब घालून येणाऱ्या मुलींना महाविद्यालयाने प्रवेश नाकारल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती. मुस्लीम महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवणं हे मानवाधिकारांचं गंभीर उल्लंघन आहे. कुणालाही या अधिकारापासून वंचित ठेवणं आणि हिजाब घातला म्हणून त्यांना दहशतीत ठेवणं ही जबरदस्ती आहे. मुस्लिमांवर भारतातील एक राज्य दबाव टाकत आहे याची जगानं दखल घ्यावी, असं ट्वीट कुरेशी यांनी केलं होतं. यानंतर ओवैसी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

असदुद्दीन औवैसी यांनी उत्तर प्रदेशमधील एका प्रचारसभेत बोलताना पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं आहे. मलालावर हल्ला पाकिस्तानमध्येच झाला होता. पाकिस्तानच्या संविधानानुसार कुणी गैरमुस्लीम व्यक्ती तिथला पंतप्रधान होऊ शकत नाही. आम्ही पाकिस्तानच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही इकडे बघू नका. तिकडेच बघा, असं ओवैसी म्हणाले आहेत.

तुमच्याकडे बलुचींची समस्या आहे. तुमच्याकडे अनेक वाद आहेत. तुम्ही ते पाहा. हा देश माझा आहे. तुमचा नाही. हा आमच्या घरचा मुद्दा आहे. तुम्ही यात आपला पाय किंवा नाक नका खुपसू. तुमचा पाय आणि नाक जखमी होईल, असा खोचक सल्ला देखील ओवैसी यांनी पाकिस्तानला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here