..अन् ‘या’ कारणामुळे प्रियांका चोप्रा झाली भावूक; शेअर केला ‘तो’ फोटो

360

मुंबई – बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या टॅलेंट मुळे चर्चेत असणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राने नुकताच मुंबईची आठवण सांगणारा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रियांकाने भारतीय खाद्यपदार्थांनी भरलेला तिच्या नाश्त्याच्या प्लेटचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने मागवलेल्या कांदेपोह्यांनी भरलेल्या प्लेटचे फोटो शेअर करत, “LA मध्ये पोहे, ज्याने मला मुंबईची आठवण करून दिली. धन्यवाद .” अशी हटके कॅप्शन देत तिने हार्ट आणि हात जोडलेला इमोजीही शेअर केला आहे.

प्रियांकाला भारतीय खाद्यपदार्थ खूप आवडतात ती त्याची विशेष चाहती आहे. लोणचे आणि कढी पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटते. न्यूयॉर्कमध्ये तिचे ‘सोना’ नावाचे स्वतःचे रेस्टॉरंट देखील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here