मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना आज ईडीकडून तब्बल आठ तास चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर नवाब मलिक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे
अटकेच्या कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी, “मला अटक झालीय, पण मी घाबरणार नाही. मी लढणार आणि जिंकणार,” अशी प्रतिक्रिया दिलीय.
अटक केल्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर गाडीमध्ये बसताना नवाब मलिक यांना पहिली प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी, “लड़ेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोस करेंगे,” असं म्हटलं.
प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिक यांची मुंबईतील ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती. दुपारी तीनच्या सुमारास मलिक यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.