अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘या’ बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत पक्षप्रवेश
आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. सीताराम घनदाट हे गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेत. याचसोबत परभणी जिल्हा परिषद सदस्य आणि अभ्युदय बँकेचे संचालक भरत घनदाट यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना अजित पवारांनी दोघांचं स्वागत केलंय.
कोरोना काळात बरीच संकटं असताना अनेक राजकीय घटना घडतायत. मात्र महाविकास आघाडीत सगळे एकत्र काम करतायत. “याआधी घनदाट मामा यांना तिकीट हवं होतं, म्हणून ते आले होते. पण त्यावेळी आम्ही देऊ शकलो नाही.”आज त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांचं स्वागत करतो असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार म्हणालेत.