नगर येथील जिल्हा रुग्णालयातील जळीत कांड प्रकरणात चौदा रुग्णांचा मृत्यू झाला होता त्यानंतर सरकारकडून कारवाई करण्यात आली आणि तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक असलेले डॉक्टर सुनील पोखरणा यांना निलंबित करण्यात आले मात्र त्यांचे हे निलंबन राज्यपाल यांनी विशेष अधिकार वापरून रद्द केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या होत्या त्यानंतर राज्यपाल यांच्या अधिकृत ट्विटर हँडल करून या प्रकरणी खुलासा करण्यात आलेला असून पोखरणा यांचे निलंबन रद्द होणे आणि त्यांना पदस्थापना देणे ही प्रक्रिया राज्य शासनाकडून झालेली आहे, असा खुलासा करण्यात आलेला आहे
राज्यपालांच्या ट्विटरने हॅन्डलने गुरुवारी दुपारी सदर खुलासा करण्यात आलेला असून त्यात म्हटले आहे की, ‘ अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पन्नालाल पोखरणा यांचे निलंबन रद्द होणे किंवा निलंबन रद्द झाल्यानंतर त्यांची नव्याने पदस्थापना होणे या निर्णयाबाबतची संपूर्ण कार्यवाही शासनस्तरावर करण्यात आलेले आहे त्यामुळे काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त हे पूर्णपणे निराधार आहे . ‘
6 नोव्हेंबर 2021 रोजी नगर येथील जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग इथे आग लागली होती. सुरुवातीला 11 आणि उपचारादरम्यान तीन अशा एकूण 14 जणांचा यात मृत्यू झाला होता. नगर येथील तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांच्यासह इतर चार जणांचे देखील निलंबन करण्यात आले होते आणि चार जणांना अटक करण्यात आली होती.
डॉक्टर पोखरणा यांना अटकपूर्व जामीन देण्यात आलेला होता त्यानंतर अटकही करण्यात आली आणि लगेच काही तासात सुटका देखील करण्यात आली होती.










