सोने-चांदीच्या दरात बदल, हा आहे आजचा दर
सोने-चांदीच्या दरात आज घसरण पाहायला मिळत आहे. आज सकाळी देशभरातील सराफ बाजारा सोने-चांदीच्या दरातील घसरणाने उघडला.
सोमवारी शुक्रवारच्या तुलनेत २४ कॅरेट सोन्याच्या दरात थोडी घसरण पाहायला मिळाली.
सोन्याचा आजचा दर ५५ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त होऊन ५१,३८६ रुपये एवढा आहे.
तर २३ कॅरेट सोन्यचा दर हा ५१,१८० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा दर हा ४७,०७० रुपये आहे.
१८ कॅरेटच्या सोन्याचा दर ३८,५४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
तर चांदीचा दर १९८ रुपयांनी कमी झाला आहे. आज चांदीचा दर ६५,२२६ रुपये प्रति किलोग्रॅम इतकं आहे.