सुरुवातीला महाराष्ट्र-गुजरात राज्य अशी बससेवा सुरू होत आहे. एसटीच्या धुळे विभागातून आजपासून धुळे-सुरत

803

आजपासून राज्याबाहेरही एसटी चा प्रवास सुसुरुवातीला महाराष्ट्र-गुजरात राज्य अशी बससेवा सुरू होत आहे. एसटीच्या धुळे विभागातून आजपासून धुळे-सुरत, शिरपूर-सुरत, दोंडाईचा-सुरत अशी आंतर राज्य बस सेवा सुरू होत आहे. यासाठीचं नियोजन एसटीच्या धुळे विभागाकडून करण्यात आलं आहे.

एका सीटवर एकच प्रवाशी या प्रमाणे एका बसमध्ये केवळ 22 प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी आहे.

प्रवाशांना एसटीत बसल्यानंतर देखील मास्कचा वापर करणं आवश्यक राहणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता टप्याटप्याने अहमदाबाद, बडोदा, तसेच मध्यप्रदेशसाठी देखील आंतरराज्य बस सेवा सुरू होणार आहे. हळूहळू सर्वच मार्गांवरील एसटीची सेवा सुरळीत सुरू होणार आहे.

23 मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे एसटीची सेवा ठप्प झाली होती. साधारण पाच महिन्यांच्या कालावधी नंतर एसटीची आंतरराज्य बस सेवा पुन्हा सुरु झालीय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here