- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाहक स्व. शांतीकुमारजी फिरोदिया यांच्या जयंतीनिमित्ताने पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयाला कोविड रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरची अद्यावत यंत्रणा रसना उद्योग समुहाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. युवानचे संस्थापक अध्यक्ष संदीप कुसळकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी रसना उद्योग समुहाने सहा लाख रुपयांची ही यंत्रणा दिली आहे. यावेळी तहसिलदार शाम वाडकर यांनी आय लव्ह नगरचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया व युवान संस्थेचे अध्यक्ष संदीप कुसळकर यांच्या कोरोना काळातील कार्याचे कौतुक केले.
Home महाराष्ट्र अहमदनगर युवानचा पुढाकार; शांतीकुमारजी फिरोदिया जयंतीनिमित्त रुग्णालयाला ऑक्सिजन यंत्रणा