मुलानेच केला मित्रांचे मदतीने बापाचा खून, निघोज, ता-पारनेर येथील खूनाचे रहस्य उलगडले,

938

मुलानेच केला मित्रांचे मदतीने बापाचा खून, निघोज, ता-पारनेर येथील खूनाचे रहस्य उलगडले,

पारनेर पोलीस स्टेशनची कारवाई

दिनांक २७/०८/२०२० रोजी १५/३० वा. चे सुमारास कुकडी नदी पात्रात कुंड परिसर, निघोज, ता पारनेर, जि- अहमदनगर येथे एका पत्र्याचे धान्याचे कोठीमध्ये एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत, वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे हा मयत स्थितीत मिळून आला. त्यास कोणीतरी अज्ञात इसमांनी अज्ञात हत्याराने मारुन प्रेत पेटीत घालून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने कुकडी नदी पात्रात टाकून दिले. त्याबाबत फिर्यादी श्री. दामू धोंडीबा घोडे, वय- ४४ वर्षे, धंदा-शेती माजी सरपंच, रा. टाकळी हाजी, ता- शिरुर, जि- पुणे यांनी पारनेर पो. स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ७२६/२०२०, भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात अनोळखी इसमाचा, कोणीतरी अज्ञात इसमांनी, कोणत्यातरी हत्याराने खून केला व मयतास

जिवे ठार मारले. मारेकऱ्याने कसलाही पुरावा घटनास्थळी राहणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली होती. घटनेचे गांभिर्य ओळखून घटनास्थळी तात्काळ मा. श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, डॉ. श्री. सागर पाटील, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अहमदनगर, श्री. दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर, श्री. राजेश गवळी, सपोनि/पारनेर पो.स्टे. यांनी श्वान पथक, फिंगर प्रिन्टतज्ञ, सायबर तज्ञ पथकातील कर्मचाऱ्यासह भेट दिली. वरिष्टांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे, मयातचे व त्याचे सोबत मिळून आलेल्या वस्तूंची शोध पत्रीका व तपास याद्या तयार करुन पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखा स्तरावर वेगवेगळे पथके तयार करुन घटना ठिकाणचे परिसरात, लगतचे गावामध्ये, एमआयडीसी भागात जावून माहीती संकलीत करण्यात आली. तपासा दरम्याण दि. ११/०९/२०२० रोजी रांजणगांव एमआयडीसी पो.स्टे. शिरुर, जि पुणे येथे मयताचे

वर्णनाशी मिळती-जूळती मिर्सींग दाखल झाले बाबत माहीती प्राप्त झाल्याने तपास पथकातील पोउनि/बोत्रे, पोशिदिवटे, चौगुले अशांनी रांजणगांव एमआयर्ीसी पो.स्टे. येथे जावून माहीती घेतली असता दि. ०८/०९/२०२० रोजी सतिष सदाशिव कोहकडे, वय- ४९ वर्षे, रा. कारेगांव, ता- शिरुर, जि- पुणे हा दि. २५/०८/२०२० रोजी पहाटे पासून मिसींग झाले बाबत मिसींग रजि. नोंद असल्याने त्यांनी लागलीच मयताचे नातेवाईकांशी संपर्क करुन त्यांना मयताचे कपडे, करदोरा, हातातील दोरा व मिळून आलेल्या वस्तूंचे फोटो दाखविले असता मयताचे नातेवाईकांनी मयत हा मिसींग व्यक्तीच असल्याचे खात्रीलायक सांगीतले. मयताची ओळख पटविणे कामी मयताचे राखून टेवलेले शारिरीक घटक तसेच नातेवाईकांचे DNA चाचणी नियोजन करण्यात आले. सदर गुन्ह्याचे तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून कारेगांव येथील तांत्रीक व गोपनिय बातमीदाराचे माहीती वरुन मयाताचे मृत्यू बावत त्याचे मुलाकडे सखोल चौकशी करण्यात आली. सुरुवातील मयताचे मुलाने टाळाटाळ केली, परंतू त्याचेकडे अधिक कसून चौकशी करता त्याने वडील आईला योग्य वागणूक देत नसल्याने व घरभाड्याचे व शेतीचे असलेले सर्व पैसे हे वडील त्यांचे अनैतिक संयध असलेल्या दुसऱ्या महीलेवर खर्च करतात, यावरुन त्याचे आपले वडीलांशी नेहमी वाद होत होते. दि. २३/०८/२०२० रोजी सायंकाळी १९/३० वा चे सुमारास त्याचे वडीलाचे अनैतिक संवधाच्या कारणावरुन वाद होवून आईला मारहाण केल्याचा राग ठेवून मयताचा त्याचा मुलगा नामे १) प्रदीप सतिष कोहकडे, रा. कारेगांव, ता- शिरुर, जि- पुणे याने त्याचे मित्र २) हर्षल सुभाष कोहकडे, ३) श्रीकांत वाळ पाटोळे, दोन्ही रा. कारेगांव, ता- शिरुर, जि- पुणे आणि त्याचे इतर दोन अल्पवयीन साथीदार यांचे
मदतीने मयताचे राहते घरामध्ये त्याचे डोळ्यामध्ये मिरची पुड टाकून तोंड दाबून कापडी पट्टयाने गळा आवळून खून केल्याचे सांगून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मयताचे प्रेत निळे रंगाचे मारुती ८०० या कारमध्ये टाकून निघोज येथील कुंडावरील पुलावरुन वाहते पाण्यामध्ये टाकून दिले व त्यानंतर बनाव रचून मयताची कार ही शिरुर तालूक्यातील करडे येथील घाटामध्ये खाली दरीमध्ये सोडून दिल्याची कबुली दिल्याने वर नमुद आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील सखोल तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/राजेश गवळीर, पारनेर पो.स्टे. हे करीत आहेत.

सदरची कौतुकास्पद कामगिरी ही मा. श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, डॉ. श्री. सागर पाटील, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि/राजेश गवळी, सपोनि/वाघ, पोसई/पदमने, पो/बत्रा, पोहे को/जाकिर शेख निकम, पोकॉ/दिवटे, चौगुले, खाडे, पाचारणे, शिंदे, राठोड यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here