मिरी,ता पाथर्डी शिवारात गावठी कट्टा (पिस्तुल)बाळगणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचेकडून जेरबंद.

887

मिरी,ता पाथर्डी शिवारात गावठी कट्टा (पिस्तुल)बाळगणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचेकडून जेरबंद.

दिनांक १६/०९/२०२० रोजी श्री.दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गोपनिय माहीती मिळाली कि. इसम नामे आकाश धनवटे, रा. मिरी, ता- पाथर्डी हा गावठी कट्टा कब्जात बाळगून मिरी बस स्टैंड परिसरात फिरत आहे, आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पथकातील पोहेकॉ/मनोज गोसावी, पोना/सचिन आडबल, लक्ष्मण खोकले, विशाल दळवी, रविकिरण सोनटक्के पोको रणजित जाधव, संदीप दरंदले, सागर सुलाने व चालक पोहेकॉबाळासाहेब भोपळे यांनी मिळालेल्या गोपनिय माहीतीनुसार मिरी, ता. पाथर्डी येथे जावून बस स्टैंड परिसरामध्ये सापळा लावुन आरोपी नामे आकाश आण्णा धनवटे, वय- २३ वर्षे, रा. मिरी, ता- पाथर्डी यास ताब्यात घेवून त्याची पंचासमक्ष पोहेकॉ/मनोहर गोसावी यांनी अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये ३०,२००/-रु किमतीचे देशी बनावटीचे गावठी कटटा (पिस्तुल) व एक जिवंत काडतुस मिळून आल्याने ते जप्त करण्यात आलेला असुन सदर बावत पाथर्डी पो. स्टे. येथे गुरनं. 1 010/२०२०, भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई पाथर्डी पो.स्टे. हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. अखिलेश कुमार सिंह, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. सागर पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. मंदार जावळे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here