मिरी,ता पाथर्डी शिवारात गावठी कट्टा (पिस्तुल)बाळगणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचेकडून जेरबंद

781

मिरी,ता पाथर्डी शिवारात गावठी कट्टा (पिस्तुल)बाळगणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचेकडून जेरबंद.

अहमदनगर :
दिनांक १६/०९/२०२० रोजी श्री.दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गोपनिय माहीती मिळाली कि. इसम नामे आकाश धनवटे, रा. मिरी, ता- पाथर्डी हा गावठी कट्टा कब्जात बाळगून मिरी बस स्टैंड परिसरात फिरत आहे, आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पथकातील पोहेकॉ/मनोज गोसावी, पोना/सचिन आडबल, लक्ष्मण खोकले, विशाल दळवी, रविकिरण सोनटक्के पोको रणजित जाधव, संदीप दरंदले, सागर सुलाने व चालक पोहेकॉबाळासाहेब भोपळे यांनी मिळालेल्या गोपनिय माहीतीनुसार मिरी, ता. पाथर्डी येथे जावून बस स्टैंड परिसरामध्ये सापळा लावुन आरोपी नामे आकाश आण्णा धनवटे, वय- २३ वर्षे, रा. मिरी, ता- पाथर्डी यास ताब्यात घेवून त्याची पंचासमक्ष पोहेकॉ/मनोहर गोसावी यांनी अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये ३०,२००/-रु किमतीचे देशी बनावटीचे गावठी कटटा (पिस्तुल) व एक जिवंत काडतुस मिळून आल्याने ते जप्त करण्यात आलेला असुन सदर बावत पाथर्डी पो. स्टे. येथे गुरनं. 1 010/२०२०, भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई पाथर्डी पो.स्टे. हे करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here