भारतात कोरोना संक्रमितांचा आकडा 48 लाखांच्या पार; मागील 24 तासांत आढळले 92,071 नवे रुग्ण

784

भारतात कोरोना संक्रमितांचा आकडा 48 लाखांच्या पार; मागील 24 तासांत आढळले 92,071 नवे रुग्ण

केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार,

भारतात (India) मागील 24 तासांत 92,071 नवे रुग्ण आढळले असून 1136 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे.

▪️यामुळे देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 48 लाख 46 हजार 428 वर (Coronavirus Positive Cases) पोहोचली आहे. तर आतापर्यंत एकूण 79,722 (Coronavirus Death Cases) रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील हा आकडा कोरोना व्हायरसची गंभीर परिस्थिती दर्शविणारा आहे. कारण मृतांचा एकूण आकडा देखील 79,000 च्या पार गेला आहे.

देशात सद्य घडीला 9 लाख 86 हजार 598 रुग्णांवर (Coronavirus Active Cases) उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

तर दुसरीकडे देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत असून आतापर्यंत एकूण 37 लाख 80 हजार 108 रुग्णांनी (Coronavirus Recovered Cases) कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here