?️ बिहार निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणुकांना हिरवा कंदील
⚡ कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहार निवडणूक पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.
? जोपर्यंत बिहार राज्य कोरोनामुक्त होत नाही तोपर्यंत निवडणूक घेतली जाऊ नये अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती.
? निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत दखल देता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
? जोपर्यंत निवडणूक आयोग याबाबत काही अधिसूचना जारी करत नाही, तोपर्यंत न्यायालयाकडून यामध्ये हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही.
?️ न्यायाधीश अशोक भूषण म्हणाले कि…
? निवडणूक पुढे ढकलण्यासाठी कोविड आधार असू शकत नाही. मुख्य म्हणजे अद्याप निवडणुकीची सूचनाही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.
? ही याचिका गैरसमजातून करण्यात आलेली असून तिला दाखल करुन घेऊ शकत नाही.
?️ निवडणूक आयुक्त अरोरा म्हणाले कि…
? मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक वेळेवरच घेतली जाईल.
? तसेच निवडणूक आयोग कोरोना विषाणूची परिस्थिती नजरेसमोर ठेवून तयारी करीत आहे. ती करताना आवश्यक ती खबरदारीही घेत आहे.
? चालू वर्षाच्या शेवटच्या महिन्यात बिहारमधील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.











