(पुणे) अत्यावश्यक सेवे’च्या वाहनातून गुटख्यासह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त ; दोघांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

769

‘अत्यावश्यक सेवे’च्या वाहनातून गुटख्यासह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त ; दोघांवर गुन्हा दाखल

पुणे पोलिसाची यशस्वी कामगिरी
खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने (पश्चिम विभाग) हडपसरजवळील फुरसुंगी हद्दीत एका उच्चभ्रू सोसायटी छापा मारुन टेम्पोत साठवून ठेवलेला तब्ब्ल 12 लाख 14 हजार 529 रुपयांचा विमल पान मसाला, व्हि 1 तंबाखू व अन्य मुद्देमाल जप्त केला. या टेम्पोवर ‘अत्यावश्यक सेवा’ असा फलक होता. या प्रकरणी दोघाजणांविरोधात हडपसर (पुणे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंदार राजेंद्र ठोसर( रा. हडपसर, पुणे ) आणि मनोज सुमतीलाल दुगड ( रा. भक्ती विहार सोसायटी, फुरसुंगी, हडपसर, पुणे), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पुणे पोलीस दलाच्या खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते कर्मचाऱ्यांसह हडपसर परिसरात गस्त घालत होते.

त्यावेळी पोलीस कर्मचारी प्रमोद टिळेकर आणि अमोल पिलाने यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी फुरसुंगी येथील भेकराईनगर मधल्या उच्चभ्रू भक्ती विहार सोसायटीत छापा टाकला.

त्यावेळी सोसायटी आवारात उभ्या केलेल्या एका टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये 9 लाख 14 हजार 529 रुपयांचा विमल पान मसाला, व्हि 1 तंबाखूचा साठा व अन्य अन्य साहित्य असा एकूण 12 लाख 14 हजार 529 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक निलेश महाडिक, कर्मचारी उदय काळभोर, रमेश गरुड , प्रमोद टिळेकर आणि अमोल पिलाने आणि मोहन येल्पले यांनी कारवाईत भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here