पालकमंत्र्यांनी तपासाला कोविड रुग्णलयातील जेवणाचा दर्जा,
RTPCR लॅबची केली पाहणी.
बुलढाणा – कोविड रुग्णालयात कोरोना रुगांना देण्यात येणार जेवण व्यवस्थित नसल्याच्या तक्रारी पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आज जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन जेवणाचा दर्जा तपासाला व जेवणाचा दर्जा कसलीही तडजोड करू नये अन्यथा कडक कारवाही करू असा सज्जड इशारा संबधित ठेकेदार व अधिकारी यांना दिला.
यावेळी त्यांनी कोविड रुग्णालयात तयार करण्यात येत असलेल्या RTPCR लॅबची देखील पाहणी केली. या लॅबचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याबद्दल तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली. परंतु आता या लॅब करिता लागणारी सर्व साधनसामग्री उपलब्ध झाल्याने येत्या चार दिवसात या लॅबचे काम पूर्ण करून हि लॅब कार्यान्वित करावी अन्यथा पाचवा दिवस माझा असेल अशा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्री महोदयांनी दिला.
यावेळी त्यांच्या बरोबर बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होत