पाथर्डी, नगर तालुका हददीत दिवसा घरफोडया करणा-या सराईत गुन्हेगारास पाथर्डी पोलीस स्टेशनचे मदतीने मुददेमालासह केले जेरबंद
दि. १०/०९/२०२० रोजी फिर्यादी श्री मोहन भाऊसाहेब घालमीक, वय २८, रा. राघुहिवरे, ता पाथर्डी जि. अ.नगर यांचे राहते घरातील दुपारी १५/०० ते १५/२० च्या दरम्याण कोणीतरी अज्ञात चोरटयाने सोन्याचे दागिणे व रोख रक्कम दिवसा घरात प्रवेश करुन घरफोडी करुन चोरी केले आहे. त्याबाबत फिर्यादी यांनी पाथर्डी पो.स्टे येथे दिलेल्या फिर्याद वरुन पाथर्डी पो.स्टे. गु.र.नं. ६८८/२०२० भादवी कलम ४५४,३८०
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज दिनांक १२/०९/२०२ रोजी सदर गुन्हयाचा पोनि दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे पथकातील अधिकारी कर्मचारी यांचे मदतीने पाथर्डी हददीत समांतर तपास करत असतांना पो.नि. दिलीप पवार यांना पाथर्डी पो.स्टे. चे पोनि. श्री रमेश रत्नपारखी यांनी कळविले की, राघुहिवरे ता. पाथर्डी येथे एक संशयीत इसमास चोर समजुन नागरीकांनी पकडले असुन तो घरफोडी करणारा आरोपी असण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाल्याने मा. पोनि, श्री दिलीप पवार यांचे आदेशाने पथकातील सपोनि. शिशीरकुमार देशमुख, पोहेकॉ/बाळासाहेब मुळीक, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, पोना/सचिन आडबल, पोना/रविकिरण सोनटक्के विशाल दळवी, पलकों/कमलेश पाथरुट, मेघराज कोल्हे, रोहीत मिसाळ, रणजीत जाधव, चापोहेकॉ/संभाजी कोतकर, असे सदर ठिकाणी गेलो असता तेथे श्री पोनि. श्री रमेश रत्नपारखी व पोहेकों चव्हाण, पोकॉ/खोमणे हे आले होते स्थानिक गुन्हे शाखा अ.नगर व पाथर्डी पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी यांनी सयुक्त रित्या संशयीत इसम नामे १) अमोल बाळु वाळके, वय २९, रा.सय्यदमीर लोणी, ता आष्टी जि. बीड यास ताब्यात घेतले असता त्यास जमावाने चोरीचा संशय घेवुन मारहाण केलेली होती. त्यास ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने यापुर्वी पाथर्डी, नगर तालुका, येथे दिवसा घरफोडी केल्याचे कबुल केल्याने त्याबाबत सदर ठिकाणाहुन माहिती घेता पुढील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) नगर तालुका पो.स्टे. गु.र.नं. १५६६/२०२० भादवी कलम ४५४,३८०
२) नगर तालुका पो.स्टे. गु.र.नं. १४८२/२०२० भादवी कलम ४५४,३८० ३) पाथर्डी पो.स्टे. गु.र.नं. १६८८/२०२० भादवी कलम ४५४,३८०
वरील प्रमाणे गुन्हे दाखल असुन त्यास त्यामधिल मुददेमाला बाबत विचारपुस करता त्याने वरील ३ ही घरफोडीचे गुन्हयातील सोन्याचे दागिने हे चिचोंडी पाटील येथील खांडविकर ज्वेलर्स चे अक्षय सुनिल मिसाळ, या सोनारास विकले असल्याचे कबुली दिल्याने चिंचोडी पाटील ता नगर येथे जावुन तेथील २)अक्षय सुनिल मिसाळ, वय २५, रा झारेकर गल्ली, अ.नगर यास ताब्यात घेवुन सदर बाबत विचारपुस केली असता त्याने आरोपी नामे अमोल बाळु वाळके, रा.सय्यदमीर लोणी, ता आष्टी जि. बीड याचेकडुन चोरीचे सोने घेतल्याचे कबुल करुन विकत घेतलेले अंदाजे १,२५,०००/- रु किमतीचे ५० ग्रॅम वजनाचे वेगवेगळे सोन्याचे दागिने काढुन दिल्याने ते जागीच जप्त करुन सविस्तर पंचनामा करुन आरोपी क्र. १ व २ यांना पुढील तपास कामी पाथर्डी पो.स्टे. येथे मुददेमालासह हजर करण्यात आले आहे. पुढील तपास पाथर्डी पो.स्टे. करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अखिलेश कुमार सिंह, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. सागर पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. मंदार जावळे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.