‘टोल’चे दर 1 सप्टेंबरपासून वाढणार?
देशात 1.40 लाख कि.मी. लांब महामार्ग आहेत. 25,000 कि.मी. मार्गावर टोल वसूल केला जातो. मंत्रालयाची अशी योजना आहे की, आगामी 5 वर्षांत नव्या टोल मार्गाची निर्मिती 75 हजार कि.मी.पर्यंत करावी. यामुळे टोल महसुलात वाढ होईल.
2019-20 मध्ये सरकारला मागील आर्थिक वर्षात टोल टॅक्समधून 30,000 कोटी रुपयांची कमाई झाली होती. देशात एकूण 563 टोल प्लाझावर टोल वसूल करण्यात येतो.
सप्टेंबरपासून वाढणार टोलचे दर-
टोल प्लाझातून जाणाऱ्या वाहनांना आगामी महिन्यापासून अधिक टोल द्यावा लागणार आहे. परिवहन मंत्रालयाने टोल टॅक्सच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
खासगी आणि व्यावसायिक वाहनांना वेगवेगळे दर आकारले जातील. नवे दर 1 सप्टेंबरपासून लागू होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे प्रत्येक वाहनाला 5 ते 10 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.
सरकार रस्ते अपघातातील जखमींसाठी एक योजना घेऊन येण्यावर विचार करत आहे. यात हीट अॅण्ड रनचे शिकार झालेले किंवा अशा व्यक्ती ज्या थर्ड पार्टी विमा नसलेल्या वाहनाच्या तडाख्यात सापडल्या आहेत, अशांचा समावेश असेल. याचा भारही या टोलच्या दरावर पडू शकतो.