जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी आणखी २० जणांचा बळी गेला
17 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी आणखी २० जणांचा बळी गेला. आतापर्यंत ५३३ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासात नवे ९०६ रुग्ण आढळले. त्यामुळे बाधितांची संख्या ३३ हजार ८१३ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ९६, खासगी प्रयोगशाळेत ४०३ आणि अँटीजेन चाचणीत ४०७ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा ४५, संगमनेर ५, राहाता १,
नगर ग्रामीण १७, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट १,नेवासे ७, श्रीगोंदे ४, अकोले १, राहुरी २, जामखेड १, मिलिटरी हॉस्पिटल ११ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत मनपा १६३, संगमनेर १०, राहाता २३,पाथर्डी ५, नगर ग्रामीण ५४, श्रीरामपूर २१, कॅन्टोन्मेंट ९, नेवासे १९, श्रीगोंदे ७, पारनेर २९, अकोले १३, राहुरी ३१, शेवगाव ३, कोपरगाव ७, जामखेड ६ आणि कर्जतच्या ३ रुग्णांचा समावेश आहे.