गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन
मुंबई : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल याचे आज पहाटे निधन झाले. दीर्घकाळापासून तो मूत्रपिंडाच्या आजाराशी सामना करत होता. मूत्रपिंड निकामी झाल्याने आज पहाटे आदित्यची प्राणज्योत मालवली. अवघ्या 35 व्या वर्षी आदित्य पौडवाल याचे निधन झाले आहे.