कंगनाची तुझी लाज वाटते असून उर्मिलाचा अभिमान वाटतो- लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौतआणि उर्मिला मातोंडकर ( यांच्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोघींमध्ये वाद सुरू आहेत. या वादावर आता लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर संतप्त झाल्या आहेत. त्यांनी या दोघींच्याही वादावर प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. माधुरी कानिटकर यांनी कंगनाला चांगलंच सुनावलं आहे. कंगनाचा धिक्कार करत त्यांनी उर्मिलाची बाजू घेतली आहे. कंगनाची लाज वाटक असून उर्मिलाचा अभिमान वाटतो आहे, असं त्या म्हणाल्या आहेत. माधुरी कानिटकर यांनी कंगनाचा व्हिडीओ शेअर करत ट्वीट केलं आहे त्या म्हणाल्या, “लज्जास्पद आहे हे कंगना रणौत. मी सहसा कुणाबाबत अशी प्रतिक्रिया देत नाही. मात्र एक मला म्हणून मला यामुळे खूप वेदना झाल्या आहेत. उर्मिला मातोंडकरजी आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे”
हे ‘उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार’, कंगना रणौतने उधळली मुक्ताफळं
उर्मिलाने कंगनाविरोधात वक्तव्य केल्यानंतर कंगनाने टाइम्स नाऊशी बोलताना उर्मिला मातोंडकर जहरी टीका केली, “उर्मिला देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. मला माहित आहे की ते अत्यंत निंदनीय आहे. पण ती तिच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी ना? जर तिला तिकिट मिळू शकतं तर मला का नाही?”
कंगनाच्या या विधानानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यातून तिने कंगनाला तिचे नाव न घेता उत्तर देण्याचा प्रयत्न केला असावा असे दिसते आहे.’जय महाराष्ट्र, जय हिंद, शुभ रात्री’ अशी कॅप्शन देत उर्मिलाने छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो शेअर केला.’सूड माणसाला जाळत असतो, संयमच सुडावर नियंत्रण मिळवण्याचा उपाय असतो.’, असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.