?️ श्रावणच्या पहिल्या सोमवारी घृष्णेश्वराच्या कळसाचेच दर्शन; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाभाऱ्यातील दर्शन बंद.
?️ जिल्हा प्रशासन आणि गरवारे कंपनीच्या बाल कोविड केअर सेंटरबाबत सांमजस्य करार झाला असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिरकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि गरवारे कंपनीचे संचालक एस. व्ही. आमलेकर यांनी केली करारावर स्वाक्षरी.
?️ राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते पोलिस बांधवांसाठी प्रतिक्षा कक्ष व सुसज्ज शौचालय बांधकामाचा शुभारंभ.
?️ अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत जिल्ह्यातील जून, जुलै महिन्यातील घडलेल्या गुन्ह्यांचा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आढावा.
?️ जिल्ह्यातील पोलीस बांधवांना पायभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देवू- राज्यमंत्री अब्दुल सत्तार.
?️ हनुमान चौकात मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू; पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
?️ सोयगाव तालुक्यात मिरचीचे पीक धोक्यात; बुरशीची लागण झाल्याने शेतकरी वर्गांत चिंता.
?️ सोयगावचे तहसीलदार प्रवीण पांडे यांची उस्मानाबादला जिल्हाधिकारी कार्यालयात बदली.
?️ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोयगाव पंचायत समिती कार्यालयासमोर निषेध दिन.
?️ पावसाअभावी करपलेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या -राज्यमंत्री अब्दुल सत्तार.
?️ माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना मराठा आरक्षणासंदर्भात जंतर-मंतर दिल्ली येथे अटक.
?️ महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात मंगळसूत्र चोरणाऱ्या कुख्यात चोरट्यांना अजिंठा-बुलढाणा रोडवर जेवणास येताच केली अटक.
?️ फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द येथे विषारी औषध प्राशन करून 45 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या; अवघ्या दीड महिन्यात दोन्ही भावांनी जीवन संपविले.
?️ जायकवाडी डावा कालवा ते उजवा कालवा रस्ता कामासाठी 5 कोटी निधी मंजूर; रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते शुभारंभ.
?️ छावणी रेल्वे उड्डाणपुलाजवळ मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस समोर एकाची आत्महत्या.
?️ शहरातील जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यासमोर एका व्यक्तीवर धारधार हत्याराने पायावरती वार केल्याची घटना काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.
?️ जिल्ह्यामध्ये ताप असणाऱ्या मुलांच्या होणार RTPCR चाचण्या – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण.
?️ हर्सूल कारागृहात कैद्याने केली शिपायाला मारहाण.
?️ फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार गावात 50 लाख खर्चून पोलीस कॉलनी आणि चौकी उभारणार -राज्यमंत्री अब्दुल सत्तार.