ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी केंद्राकडून आता ‘सायबर दोस्त’ उपक्रम
Maha 24 news
सध्याच्या काळात ऑनलाईन फसवणुकीद्वारे ग्राहकांना आर्थिक गंडा घालण्याचे प्रमाण लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने नवीन उपक्रम सुरु केला आहे.
? यानुसार सायबर सुरक्षा आणि जागरूकतेसाठी ‘सायबर दोस्त’ नावाच्या ट्विटर हँडलवरून ग्राहकांना सूचना व टिप्स देण्यात येत आहेत.
? ‘सायबर दोस्त’च्या टिप्स :
▪️ विश्वासातील माणसांसोबत संवाद साधने, आर्थिक व्यवहार आणि सोशल नेटवर्किंग साईट्स या गोष्टींसाठी वेगवेगळी ईमेल खाती वापरा. यामुळे ऑनलाईन फसवणूक टळू शकते.
▪️ ऑनलाईन फसवणूक करणारे अनेकदा ईमेल पाहून ग्राहकांना त्यांच्या बँक खात्याची, क्रेडिट कार्ड्सची माहिती देऊन आपल्या जाळ्यात ओढत असल्याने आर्थिक व्यवहारांचा ईमेल कुणाशी शेअर करू नका.
▪️ वेब ब्राऊजरद्वारे पेमेंट करताना किंवा माहिती भरताना ऑटो-फिलचा पर्याय न निवडता सीव्हीव्ही, एक्स्पायरी डेट, कार्ड नंबर, बँक खाते क्रमांक हि माहिती काळजीपूर्वक भरावी.
▪️ सोशल मीडियावर आर्थिक व्यवहारासाठी असलेला ईमेल किंवा इतर डिटेल्स शेअर करू नका. असे केल्यास तुमचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करून तुमच्या परिचितांना आर्थिक मदत मागितली जाऊ शकते.