आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी आज तहसील कार्यालय राहाता येथे कोपरगाव मतदारसंघात असलेल्या राहाता तालुक्यातील ११ गावांमध्ये अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा आढावा घेतला. तसेच या ११ गावांमध्ये सुरू असलेल्या विविध कामांची माहिती घेतली.
कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वेळेवर उपस्थित राहिले पाहिजे अशा सूचना यावेळी आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे यांनी कृषी विभागाला दिल्या तसेच कामाचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी कृषी विभागाला दिला.
यावेळी तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, कृषी अधिकारी श्री. शिंदे, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, वाकडीचे सरपंच डॉ. संपत शेळके, दत्तात्रय कोते, विष्णू वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, ज्ञानदेव धनवटे, राष्ट्रवादी पदवीधर युवक तालुकाध्यक्ष सचिन धोर्डे, संजय धनवटे, आण्णासाहेब कोते, अशोक काळे, अरुण बोंबले, दिलीप चौधरी, शिवाजी साबदे, राजेंद्र धनवटे, खंडेराव वहाडणे, बाबासाहेब नळे, पद्मकांत सुराळकर, पोपट बरवंट, बाबासाहेब वाघ, महेश जाधव, ज्ञानेश्वर वर्पे, नितीन वाकचौरे, सुनील कुरकुटे, रंजित बोठे, ११ गावांतील सर्व मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते.