वॉशिंग्टन : कोरोनाग्रस्त असलेल्या सर्व अमेरिकन नागरिकांवर मोफत उपचार करण्यात येतील, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. विस्कॉन्सिन येथील विमानतळावर झालेल्या सभेत ते बोलत होते. मी कोरोनाबाधित असताना माझ्यावर जे अँटिबॉडी उपचार झाले तेच उपचार जनतेलाही मोफत उपलब्ध करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
बायडन भारतासाठी वाईट : ट्रम्प ज्युनिअर
दरम्यान, डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन हे भारतासाठी वाईट आहेत. आपल्यासमोर आता चीनचा धोका आहे. तो समजून घेतला पाहिजे आणि चीनचा धोका इंडिनय-अमेरिकन्सपेक्षा अधिक चांगला कुणालाही समजणार नाही. बायडन यांनी चीनशी हातमिळवणी केल्याने ते भारतासाठी कदापि चांगले ठरू शकत नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी केले आहे. अहमदाबादची सभा सर्वात मोठी ज्युनिअर ट्रम्प म्हणाले की, मला भारतीय समुदाय चांगला कळतो. हे लोक मेहनती आहेत. स्वतःचे कुटुंब आणि शिक्षणावर ते लक्ष देतात. इंडियन-अमेरिकन समुदायाला चांगले कळते की, डेमोक्रॅटस् गेल्या सहा महिन्यांपासून काय करीत आहेत. माझ्या वडिलांच्या अमेरिकेत मोठ्या सभा होतात; पण अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेली सभा आतापर्यंतची सर्वांत मोठी होती. ट्रम्प आणि मोदींचे संबंध उत्तम आहेत. याचा फायदा भविष्यात दोन्ही देशांना होईल