मुंबई – IPL 2022 साठी पुढच्या महिन्यात होणाऱ्या मेगा लीलावासाठी प्रत्येक संघाने तयारी सुरु केली आहे. या लिलाव मध्ये बहुतेक संघ आपल्यासाठी एक भारतीय कर्णधार शोधत आहे. ज्यामुळे ते आपल्या चारही विदेशी खेळाडूंना रोटेशन करू शकतात.
समोर आलेल्या माहितीनुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स हे आपल्यासाठी भारतीय कर्णधार शोधत आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर, मनीष पांडे यासारखे भारतीय खेळाडू सध्या चर्चेत आहे.
तर दुसरीकडे मेगा लीलावापुर्वीच आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची नजर श्रेयस अय्यरवर आहे. आरसीबीला आयपीएल2022 साठी कर्णधाराची गरज आहे. मागच्या वर्षी विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्याने हा संघ नवीन भारतीय कर्णधार शोधत आहे.अशा स्थितीत श्रेयस अय्यर हा आरसीबीसाठी उत्तम ठरू शकतो.
श्रेयस अय्यरने आपल्या कर्णधारपदाखाली दिल्ली कॅपिटल्सला नवी उंची दिली. अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने 2020 मध्ये अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. ज्यामध्ये त्यांना मुंबईकडून पराभव स्वीकारावा लागला होता.