World Cup : भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा विश्वचषकाला गवसणी घालेल : विक्रम फिरोदिया

    147

    World Cup : नगर: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) २०११ नंतर पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषक (World Cup) क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. आताच्या विश्वचषकात सलग दहा सामने जिंकण्याची विराट कामगिरी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखालील संघाने केली आहे. ‌आता उद्या (रविवारी) अहमदाबाद येथील सामन्यातही भारतीय संघ विजयाची मालिका कायम ठेवत विश्वचषकाला गवसणी घालेल. १४० कोटी भारतीयांना पुन्हा एकदा दिवाळीची आतषबाजी करण्याची संधी मिळेल, असा विश्वास अहमदनगर ग्राहक भांडारचे अध्यक्ष उद्योजक विक्रम प्रकाश फिरोदिया यांनी व्यक्त केला.

    रविवारी (ता. १९) अहमदाबाद येथे एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना भारत व ऑस्ट्रेलिया संघात रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर जय आनंद महावीर युवक मंडळाने नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती करून भारताच्या विजयासाठी बाप्पाला साकडं घातले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जय आनंद महावीर युवक मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, विशाल गणपती मंदिराचे ट्रस्टचे अशोक कानडे, पुजारी संगमनाथ महाराज, सचिव आनंद मुथा, महिला सचिव सुरेखा बोरा आदी उपस्थित होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांचा मंदिर ट्रस्ट तर्फे अशोक कानडे यांनी सत्कार केला.

    विक्रम फिरोदिया म्हणाले की, देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विशाल गणपती मंदिरात भारतीय संघाच्या विजयासाठी केलेली प्रार्थना निश्चितच फलद्रूप होईल. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने अप्रतिम खेळ केला आहे. प्रत्येक सामना समोरच्या संघावर निर्विवाद वर्चस्व राखून जिंकला आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, के. एल.‌राहुल यांनी फलंदाजीत कमालीचे सातत्य राखले आहे. विराट कोहलीने तर सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळताना शतकांचे अर्धशतक करण्याचा भीम पराक्रम केला. गोलंदाजीत मोहम्मद शमीचा सर्वच विरोधी संघांनी धसका घेतला आहे. यावेळी भारतीय खेळाडू पहिल्या सामन्यापासून विजेत्यांच्या मानसिकतेत खेळताना दिसून आले आहे. त्यांची हीच लय अंतिम सामन्यातही कायम राहील आणि १२ वर्षांनतर भारतीय टिम पुन्हा विश्वविजेता बनेल हीच तमाम भारतीयांची इच्छा आहे. कोट्यावधी लोकांचे शुभेच्छांचे पाठबळ प्रत्येक खेळाडूला ऊर्जा देईल, असेही फिरोदिया यांनी सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here