Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर

    142

    नगर : महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक लोकसभेत आज मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने ४५४ खासदारांनी मतदान केले तर विधेयकाच्या विरोधात दोन खासदारांनी मतदान केले. आता हे विधेयक गुरुवारी मंजुरीसाठी राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. महिला आरक्षण विधेयकाला (Women Reservation Bill) केंद्र सरकारने नारी शक्ती वंदन विधेयक, असे नाव दिले आहे.

    मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशनात आयोजित केले आहे. यात आज (बुधवारी) लोकसभेत महिला आरक्षण विधेयक  बहुमताने मंजूर झाले आहे. या महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने ४५४ खासदारांनी मते दिली. तर या विधेयकाविरोधात दोन खासदारांची मते पडली. त्यामुळे हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर झाले. आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत उद्या (गुरुवारी)  सादर करण्यात येणार आहे. महिला आरक्षणावर आज (बुधवारी) लोकसभेत चर्चा झाली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी या विधेयकाच्यासंदर्भाने आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर लोकसभेत महिला आरक्षणाच्या या विधेयकावर चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले. 

    एक तृतियांश पेक्षा जास्त मतांनी हे विधेयक मंजूर झाले आहे. नारी शक्ती वंदन विधेयक (महिला आरक्षण विधेयक) लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. राज्यसभेत या विधेयकावर चर्चा होणार आहे. राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर महिला आरक्षण विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग होणार आहे. महाराष्ट्रात मात्र ३३ टक्के आरक्षण आधीच लागू आहे. 

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here