
Police : नगर : शाळेच्या संरक्षण भिंती लगत गांजा (Weed) विक्री करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी (Police) सापळा लावून शिताफीने जेरबंद केले. या दोन्ही आरोपींकडून ७३ हजार रुपये किमतीचा सहा किलो ५६६ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला. कोंडीराम बाबुराव नवले (वय ४२, रा. देवी निमगाव, ता. आष्टी, जि. बीड) व वैभव अनिल घोरपडे (वय १९, रा. बुरुडगल्ली, काळा मारुती मंदिरासमोर, नगर) अशी जेरबंद आरोपींची (c) नावे आहेत. तर घरामध्ये विक्रीसाठी ठेवलेला ३४ किलो गांजा तोफखाना पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी अमोल मदन सदाफुले (वय ३४, रा. मानकर गल्ली, भाजी मार्केट शेजारी, दिल्ली गेट, नगर) याला अटक (Arrested) केले.
दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल (Weed)
कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण दराडे यांना माहिती मिळाली की, क्लेरा ब्रुस शाळेच्या संरक्षण भिंती लगत काही व्यक्ती गांजाची विक्री करत आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक दराडे यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्यासह एक पथक तयार केले. हे पथक चांद सुलताना शाळेच्या मार्गे क्लेरा ब्रुस शाळेच्या दिशेने निघाले. पथक बंगाल चौकीच्या परिसरात येताच पथकाची विभागणी करण्यात आली. या पथकाने सापळा रचला दोन जण संशयितरित्या वावरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पथकाने दोघा संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे सहा किलो ५६६ ग्रॅम वजनाचा गांजा, ७०० रुपये रोख व दोन मोबाईल आढळून आले. पथकाने हा मुद्देमाल हस्तगत केला. दोन्ही आरोपींच्या विरोधात आमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरातून गांजा विक्री (Weed)
तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांना माहिती मिळाली की, भिंगारदिवे मळा येथील एका घरातून गांजा विक्री सुरू आहे. त्यानुसार तोफखाना पोलिसांच्या पथकाने छापा टाकत आरोपीला दाब्यात घेतले. त्याच्याकडून १२ लाख ६३ हजार रुपयांचा ३४ किलो गांजा हस्तगत केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.